Lokmat International News| इथे एका पुरुषाला दोन बायका कराव्याच लागतात अन्यथा तुरुंगाची हवा | Lokmat

2021-09-13 0

आफ्रिकेतील इरीट्रिया शहरात पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याने या देशातील पुरुषांना दोन महिलांसोबत विवाह करावा लागतो. यासाठी तिथे विशेष कायदाही बनवण्यात आला असून जो पुरूष दुसरे लग्न करण्यास नकार देईल त्याला शिक्षा म्हणून जेलची हवा ही खायला लागू शकते.काही वर्षांपूर्वी इरीट्रिया शहरातील दाम्पत्यांना मुलीच होत असत. मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या कमी असल्याने तेथील सरकारने एका मुलाने दोन मुलींसोबत विवाह करण्याचा अजबच कायदा अमलात आणला. त्या काळात या कायद्याला विरोध करून दुसरे लग्न न करणाऱ्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते.आपल्या पतीला दुसरा विवाह करण्या पासून जर एखाद्याची पहिली पत्नी रोखत असले तर तिला देखील आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. असा आणखी एक अजब कायदा तेथील सरकारने महिलावर्गासाठी काढला आहे.या कायद्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून गेल्या काही वर्षात इरीट्रिया शहरातील महिलांची लोकसंख्या कमी होत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires